पेठ वडगावमधील स्ट्राँग रूमसमोरील खाजगी सीसीटीव्ही काढल्या प्रकरणी चौकशी होणार... 

आ. सतेज पाटील यांच्या सुचनेनंतर मंत्र्यांचा आदेश  

<p>पेठ वडगावमधील स्ट्राँग रूमसमोरील खाजगी सीसीटीव्ही काढल्या प्रकरणी चौकशी होणार... </p>

नागपूर – हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथे दोन डिसेंबरला नगरपालिकेसाठी मतदान झाले. या मतदानाचा निकाल लांबणीवर पडल्याने मतदान यंत्रे पेठ वडगावमधील मराठा सांस्कृतिक भवनात ठेवण्यात आले आहेत. या स्ट्राँग रूमवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते मात्र हे  कॅमेरे प्रशासनाने आणि पोलिसांनी  काढून टाकली आहेत. तसेच स्ट्राँगरूमच्या समोर असलेल्या 'मोरे' नावाच्या व्यक्तीच्या घरावरील खासगी कॅमेरेही काढण्यात आले आहेत. 


यावर आजच्या हिवाळी अधिवेशनात आ. सतेज पाटील यांनी, एखाद्या नागरिकाने स्वतःच्या घराच्या सुरक्षेसाठी लावलेले कॅमेरे काढण्याचा अधिकार प्रशासनाला कसा काय असू शकतो? यामुळे ईव्हीएम प्रक्रियेवर संशय निर्माण होण्यास वाव मिळतो. प्रशासनाची ही बेबंदशाही चालू असून, याची चौकशी करावी आणि हे काढलेले सीसीटीव्ही तातडीने पुन्हा बसवण्याचे आदेश सरकारने द्यावेत, अशा  सुचना त्यांनी मांडल्या. यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणार हे निश्चित झाले आहे.