हिवाळी अधिवेशनात बिबट्याचा प्रवेश...
आ. शरद सोनवणेंनी वेधलं लक्ष
नागपूर – गेल्या काही महिन्यांपासून राज्यात बिबट्या धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरीही यावर राज्य सरकार ठोस उपाय योजना करताना दिसत नाही. त्यामुळे याकडे विधिमंडळाचे लक्ष वेधण्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी चक्क बिबट्याचा वेष परिधान करून विधानसभेच्या परिसरात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या या पेहराव्याची अधिवेशनात चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांनी हिवाळी अधिवेशनात बिबट्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले आहे.