काल मध्यरात्रीपासून ‘या’ राज्याने चेकपोस्ट नाका केला कडक...
सर्व कागदपत्रांची तपासणी केल्याशिवाय राज्यात प्रवेश नाही
पणजी – गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षेच्या नावाखाली ठिकठिकाणी थांबवून त्रास दिला जात आहे. त्यामुळे पर्यटकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून गोवा राज्याने काल मध्यरात्रीपासून आपल्या सीमा तपासणी नाक्याच्या सुरक्षा कडक केल्या आहेत.
गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कागदपत्रे, विमा आणि पीयूसी प्रमाणपत्र स्वयंचलित पद्धतीने तपासली जात आहेत. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले, तर वाहतूक पोलिस वाहने जागच्या जागी थांबवत आहेत. त्यानुसार राज्य सरकारने केरी, पत्रादेवी आणि पोळे या महत्त्वाच्या चेक नाक्यांवर डिजिटल प्रणाली कार्यन्वित केली आहे. त्यामुळे आता गोव्यात जाताना सर्व नियम पाळूनच प्रवेश करावं लागणार आहे.