‘या’ वाहनांकडून घेतलेले टोल त्वरित परत करा... विधानसभा अध्यक्षांचे निर्देश 

<p>‘या’ वाहनांकडून घेतलेले टोल त्वरित परत करा... विधानसभा अध्यक्षांचे निर्देश </p>

नागपूर - आजच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी,  राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.  त्यामुळे कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनांकडून टोल वसूल केला जाऊ नये, असे  निर्देश दिले आहेत. त्यानुसार, ज्या इलेक्ट्रिक वाहनांकडून टोल वसूल केला गेलाय, त्या चालकांना ती रक्कम त्वरित परत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.  त्यामुळे या पुढे राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांकडून कोणत्याही प्रकारचा टोल वसूल केला जाणार नाही हे निश्चित झाले आहे.