‘ऑपरेशन तारा’चे यश : ताडोबामधील वाघिणीचा चांदोली राष्ट्रीय उद्यानात मुक्तसंचार... 

<p>‘ऑपरेशन तारा’चे यश : ताडोबामधील वाघिणीचा चांदोली राष्ट्रीय उद्यानात मुक्तसंचार... </p>

कोल्हापूर - ‘ऑपरेशन तारा’च्या माध्यमातून राबवण्यात आलेली ताडोबामधील दुसरी मादी वाघीण T7-S2 चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारली अनुकूलन कुंपणात सॉफ्ट रिलिज झाली आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन तारा’च्या टीमला चांगले यश आले आहे.
वाघीण T7-S2 ही दोन वर्षांची असून ती पूर्णतः तंदुरुस्त, निरोगी असल्याने  चांदोली परिसरात सुरक्षित मुक्तसंचार करत आहे. 
८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोअर रेंज, पांढरपौनी परिसरातून सुरक्षितपणे तिला  पकडण्यात आले होते. त्यांनंतर तिची सखोल वैद्यकीय तपासणी करून चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. तेव्हापासून ती उद्यानातील सुरक्षित कुंपणात राहून असून तेथील भूभाग, भक्ष्य प्रजाती व स्थानिक पर्यावरणाशी हळूहळू जुळवून घेते आहे. यामुळे खुल्या जंगलात सोडण्यापूर्वी तिचे सुरक्षित पुनर्स्थापन, नैसर्गिक हालचाल व क्षेत्रीय स्थैर्य अधिक प्रभावीपणे साध्य होतं आहे.
या वाघीणीची सुरक्षित पकड, वाहतूक आणि सॉफ्ट रिलिजची संपूर्ण प्रक्रिया ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रेस्क्यू टीम व कोलारा कोअर रेंजमधील क्षेत्रीय वन कर्मचारी यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे यशस्वी झाले आहे.