2018 पासून ‘या’ जमिनीवर अजित पवारांच्या पक्षाची नजर : अंजली दमानियांचा आरोप

नवीन नाव चर्चेत 

<p>2018 पासून ‘या’ जमिनीवर अजित पवारांच्या पक्षाची नजर : अंजली दमानियांचा आरोप</p>

पुणे -  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी, पुण्यातील वतनाच्या भूखंड गैरव्यवहार प्रकरणाचा खुलासा करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नवीन आरोप केले आहे. त्यामुळे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या जमिनीवर २०१८ पासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाची नजर होती, असा आरोप त्यांनी केला आहे.
जमिनीच्या व्यवहाराची कागदपत्र आणि महत्त्वाचे पुरावे आपण खारगे समितीला देणार असून, पार्थ, अमेडिया आणि त्यानंतर आता अजित पवार यांची यात भूमिका होती. त्यांनी, निलेश मगर यांचे नाव घेतले आहे. ‘हेच ते निलेश मगर जे तेव्हा उपहापौर होते जे मगरपट्टा कंस्ट्रक्शनचे डायरेक्टर आहेत. यावर करण्यात आलेलं पॉवर ऑफ अॅटर्नी, ज्यामध्ये सगळेच्या सगळे अधिकार या पक्षानं त्यांच्याकडे घेतले होते’, असं त्यांनी म्हटले आहे.