‘गोकुळ श्री’ स्पर्धेत केर्लीच्या विश्वास कदम यांची म्हैस प्रथम तर रांगोळीच्या युवराज चव्हाण यांची गाय प्रथम...
कोल्हापूर – गोकुळ च्यावतीने घेण्यात आलेल्या ‘गोकुळ श्री’ स्पर्धेत केर्लीच्या विश्वास कदम यांची म्हैस प्रथम तर रांगोळीच्या युवराज चव्हाण यांची गाय प्रथम आली आहे.
या स्पर्धेत ११४ म्हैस व गाय दूध उत्पादकांनी सहभाग घेतला होता. विश्वास यशवंत कदम यांच्या जाफराबादी जातीच्या म्हैशीने एका दिवसात एकूण २१ लिटर ९५५ मि.ली. इतके दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला आहे तर गायीमध्ये युवराज विठ्ठल चव्हाण यांच्या एच.एफ जातीच्या गायीने एकूण ३५ लिटर ८७० मि.ली. दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला आहे