केबल चोरी प्रकरणी तिघांना अटक... एलसीबीची कारवाई
कोल्हापूर - गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत केबल चोरी केलेले चोरटे पुणे - बेंगलोर महामार्गावर येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चोरीची केबल घेवून निघालेल्या विनोद मछले, शुभम बागडे आणि चेतन लोंढे या तिघांना अटक केली. भारती विद्यापीठाकडून पुणे - बेंगलोर महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजळाईवाडी नजीक ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीची एक हजार तीनशे २२ मीटर लांबीची केबल आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एक रिक्षा असा एक लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.