इचलकरंजीत चेष्टा मस्करीतून हाणामारी...तिघांवर गुन्हा दाखल

<p>इचलकरंजीत चेष्टा मस्करीतून हाणामारी...तिघांवर गुन्हा दाखल</p>

इचलकरंजी – शहरातल्या शिवमंदिर परिसरात चेष्टा मस्करीतून हाणामारी झाली आहे. या हाणामारीच्या रागाने घरावर दगडफेक करण्यात आली असून दुचाकींची तोडफोड केली आहे. त्यामुळे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातल्या शिवमंदिर परिसरातील एका शाळेचे स्नेहसंमेलन पाहण्यासाठी सुशांत कदम हा मित्रांसह गेला होता. यावेळी त्याठिकाणी असणाऱ्या सुशांत पाखरे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सुशांतची चेष्टा मस्करी सुरू केली. यातून सुशांत आणि अक्षय पाखरे यांच्यात वाद झाला. या वादातून त्यांच्यात स्नेहसंमेलनाच्या ठिकाणीच हाणामारी झाली. हा वाद शिक्षक आणि काही नागरिकांनी मिटवला. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास अक्षय पाखरे हा आपला मित्र राहूल सूर्यवंशी आणि शाम यादव यांना घेवून बावडेकर चाळीजवळ राहणाऱ्या सुशांतच्या घराजवळ गेला. यावेळी त्यांनी सुशांतच्या घरावर दगडफेक करून नुकसान केले. तसेच त्यांनी दारात असलेल्या दुचाकींचीही तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी आले. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी सुशांत कदम याच्या फिर्यादीवरून अक्षय पाखरे, राहुल सूर्यवंशी आणि शाम यादव या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.