‘या’ प्रस्तावामुळे कोल्हापूर शहरालगतच्या ४२ गावांचा सर्वांगीण विकास होणार...
शासनाला पाठवलेल्या प्रस्तावाचं हद्दवाढविरोधी कृती समितीकडून स्वागत
कोल्हापूर - शहराला लागून असलेल्या ४२ गावांसाठी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. या प्राधिकरणास विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात यावा, असा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीने याचे स्वागत केले आहे. या प्रस्तावामुळे कोल्हापूर शहरालगतच्या ४२ गावांचा सर्वांगीण विकास होणार आहे.
या गावांना एक हजार कोटींचा निधी देण्यात यावा, अशी मागणी कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष सरपंच मधुकर चव्हाण यांनी केली आहे. हा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्राधिकरणाला स्वतःचा विकास आराखडा तयार करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. यासह हद्दीतील विकासकामी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून थेट निधी उपलब्ध होणार आहे.