"घरी बसावे लागेल..!" : आपल्याच पक्षाच्या आमदारावर मुख्यमंत्री संतापले... 

<p>"घरी बसावे लागेल..!" : आपल्याच पक्षाच्या आमदारावर मुख्यमंत्री संतापले... </p>

नागपूर – विधिमंडळाच्या  हिवाळी अधिवेशनात आज लाडकी बहिण योजनेचा  वारंवार उल्लेख केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याच आमदारावर संतापले. त्यांनी त्या आमदाराला थेट "घरी बसावे लागेल" असं सुनावलं आहे.
भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या समस्येवर सभागृहात प्रश्न उपस्थित केला. यावेळी बोलताना त्यांनी सतत लाडक्या बहिण योजनेचा उल्लेख केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच भडकले. मुख्यमंत्र्यांनी, "वारंवार लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीत आणू नका, लाडक्या बहिणींना प्रत्येक प्रकरणाशी जोडू नका, नाहीतर घरी बसावे लागेल!", असे भर सभागृहात म्हटले आहे.