नेमका तपास काय केला..? 

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह अधिकाऱ्यांना न्यायालयाने फटकारले...

<p>नेमका तपास काय केला..? </p>

कोल्हापूर – आज ग्रोबझ ट्रेडिंग आर्थिक फसवणूक प्रकरणी सर्किट बेंच येथे सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने कोल्हापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना, ‘नेमका तपास काय केला..?,  याचं म्हणणं मांडा’, असं म्हणत न्यायालयाने फटकारले आहे.

ग्रोबझ ट्रेडिंग आर्थिक फसवणूक प्रकरणात 218 कोटीहून अधिकचा घोटाळा असून 12 कोटींचा घोटाळा असल्याचा संशय दोषारोप पत्रात व्यक्त करण्यात आला आहे. याबद्दल न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी, तत्कालीन अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह इतर तपास अधिकाऱ्यांना चांगलाच जाब विचारला आहे. पुढच्या सुनावणीमध्ये पोलीस अधीक्षकांसह तपास अधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या खटल्यात गुंतवणूकदारांच्यावतीने अॅड. जयंत बारदेस्कर, अॅड.  अहिल्या नलवडे, सरकार पक्षाच्यावतीने अॅड. श्रीराम चौधरी यांनी युक्तिवाद केला.