हिवाळी अधिवेशन : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी  विरोधकांचे आंदोलन

<p>हिवाळी अधिवेशन : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी  विरोधकांचे आंदोलन</p>

नागपूर – आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारचं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी  विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले.
शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना उपनेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे,  विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील आणि महाविकास आघाडीतील इतर सर्व आमदारांनी आंदोलनात सहभाग घेतला.