राजकारण्यांचं नेमकं चाललंय काय..?

 अंबादास दानवेंनंतर मनसेनेकडून कॅश बॉम्ब...व्हिडिओ व्हायरल

<p>राजकारण्यांचं नेमकं चाललंय काय..?</p>

मुंबई – आज सकाळी उद्धव ठाकरे गटाचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी पैशांच्या बंडलांचा व्हिडीओ ट्वीट केला. त्यानंतर लगेच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी, सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्टाचाराचा व्हिडिओ फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट केला आहे.  त्यामुळे या राजकारण्यांचं नेमकं चाललंय काय..? असा आता प्रश्न उपस्थित होतं आहे. 
नागपूरमध्ये राज्याचं महत्वाचं हिवाळी अधिवेशन सुरु असताना सुरु असलेल्या व्हायरल व्हिडिओमुळे अधिवेशन गोंधळात होणार अशी शक्यता व्यक्त होत आहे.