अंबादास दानवेंनी ट्वीट केलेल्या ‘त्या’ पैशाच्या व्हिडीओमुळे राजकारणात खळबळ...
मुंबई – सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासाठी सर्व आमदार, मंत्री नागपुरात आले आहेत. असे असताना उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. तो व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओवर आमदार महेंद्र दळवी यांनी, हा व्हिडीओ मॉर्फ केला आहे, माझा काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे. परंतु सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात या व्हिडीओवर चर्चा होण्याची शक्यता आहे.