सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाला तिसऱ्या दिवशी अभूतपूर्व प्रतिसाद...

<p>सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाला तिसऱ्या दिवशी अभूतपूर्व प्रतिसाद...</p>

कोल्हापूर - तपोवन मैदानावर आयोजित सातव्या सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाचा काल तिसरा दिवस होता. डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनाला तिसऱ्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह शेती पूरक व्यवसायिकांनी मोठी गर्दी केली होती. आधुनिक यंत्रसामग्री, कृषी विषयक माहिती घेत शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्री संकल्पनेला मोठा प्रतिसाद मिळाला.

या प्रदर्शनात सहभागी पशुधनाचे प्रदर्शन पहायला येणाऱ्या लोकांना विशेष आकर्षण होते. घोड्याचे नृत्य पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कुटुंबियांसह प्रदर्शनाला भेट देत कृषी निविष्ठा, कृषी यांत्रिकीकरणासाठी आवश्यक यंत्रसामुग्री, वैशिष्ट्यपूर्ण पशु, पक्षी, शेतीविषयक विविध संकल्पना यांची माहिती घेतली.