निवडणूक निकालामुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली... 

<p>निवडणूक निकालामुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली... </p>

मुंबई – राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतदान प्रक्रिया पार पडलं. हा निकाल तीन डिसेंबरला लागणार असतानाच कोर्टाने २१ डिसेंबरपर्यंत निकाल लांबवला. आता या निकालासाठी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, नव्याने परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.  4 जानेवारी आणि 11 जानेवारी 2026 रोजी परीक्षा होणार आहे, अशी माहिती आयोगाने दिली आहे.