राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सर्वाधिक पुरवणी मागण्या ‘या’ तीन गोष्टींवर... 

<p>राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सर्वाधिक पुरवणी मागण्या ‘या’ तीन गोष्टींवर... </p>

मुंबई – आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनात 75 हजार 286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, लाडकी बहिण योजना आणि नाशिकच्या कुंभमेळ्यावर सर्वाधिक पुरवणी मागण्या करण्यात आल्या आहेत.
75 हजार 286 कोटींच्या पुरवणी मागण्यांपैकी 15 हजार 648 कोटी रुपयांच्या मागण्या या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करण्यात आल्यात. त्या खालोखाल लाडकी बहीण योजनेसाठी 6 हजार 103 कोटी तर  कुंभमेळ्यासाठी 3 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या करण्यात आल्या आहेत.