बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी उद्धव ठाकरे गटाने जिल्हा शल्यचिकित्सकांना धरलं धारेवर...
कोल्हापूर – गेल्या काही दिवसांपासून छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिलं जात असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सीपीआरमध्ये जावून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रशांत वाडीकर यांना धारेवर धरलं.
यावेळी ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना या प्रकाराबद्दल जाब विचारला आहे.