कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर गुन्हा दाखल...

<p>कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर गुन्हा दाखल...</p>

सांगली – लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

काही दिवसापूर्वी सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील बिळूरमध्ये अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी प्रवचनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी लिंगायत समाजाच्या भावना दुखावणारे  वक्तव्य केल्याचे शंकरगौंड शिवनगौंड बिरादार यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे. कर्नाटकमधील बसवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो आता जत पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

यावर अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी, कर्नाटकात लिंगायत समाज तोडण्याचे महापाप लोकप्रतिनिधी आणि सरकार करत आहे. प्रत्यक्षपणे हिंदू धर्म तोडण्याचे काम करत होते, त्यामुळे असं करू नये हे मी बोललो. संबंधित मंत्री आणि कर्नाटक सरकारने कुत्सितपणे जाऊन तक्रार दाखल केली, असल्याचे त्यांनी म्हटले आहे.