जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उद्या आरक्षण सोडत…
कोल्हापूर - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने आरक्षण सोडत कार्यक्रम उद्या सोमवारी, १३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे. पंचायत समिती सदस्य पदासाठीची आरक्षण सोडत ज्या-त्या तालुक्यातील पंचायत समितीच्या ठिकाणी होणार आहे. राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार हा आरक्षण सोडत कार्यक्रम राबवला जाणार आहे. ही आरक्षण सोडत, २०२५ च्या नव्या नियमानुसार होणार आहे.