जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आरक्षणासाठी सोमवारी विशेष सभांचे आयोजन...

<p>जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आरक्षणासाठी सोमवारी विशेष सभांचे आयोजन...</p>

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी विशेष सभा आयोजित केली आहे. या सभेसाठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांना सभा स्थळी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 
कोल्हापूर जिल्हा परिषद व कोल्हापूर जिल्ह्यातील 12 पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती/ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी सोडत पध्दतीने कार्यवाही करण्यासाठी विशेष सभा आयोजित केल्या आहेत.

जिल्हा परिषद कोल्हापूर (जि.प. निवडणूक विभाग)- ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती निर्णायक मागण्यासाठी पंचायत समिती सभागृह, शाहुवाडी, नगरपालिका मयुरबाग हॉल, पन्हाळा, तहसिल कार्यालय हातकणंगले, पहिला मजला, मिटींग हॉल, ता. हातकणंगले, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सभागृह, पहिला मजला, तहसिल कार्यालय, शिरोळ, बहुउद्देशीय सभागृह, कागल, शासकीय बहुउद्देशीय हॉल, रमणमळा, कसबा बावडा, करवीर, तहसिलदार यांचे दालन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, गगनबावडा, राजर्षी शाहू सभागृह, पंचायत समिती राधानगरी, आम. दिनकरराव जाधव सभागृह, पंचायत समिती भुदरगड, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सभागृह आजरा, महसूल भवन, गडहिंग्लज,  ऑडीटोरियम हॉल, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, चंदगड या सर्व ठिकाणी 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता सभा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.