मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन

आझाद मैदानात आंदोलनाला उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी

<p>मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन</p>

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाची घोषणा केली होती. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनास परवानगी नाकारली होती. आता न्यायालयाने त्यांना एक दिवसासाठी तीही अटींच्या अधीन राहून आंदोलनास परवानगी दिली आहे. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानात आंदोलन होणार आहे. मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार, आंदोलनासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी काही कडक अटी घालण्यात आल्या आहेत.

आंदोलनासाठी ठरवलेली अटी पुढीलप्रमाणे आहेत:
* आंदोलन आझाद मैदानातील राखीव जागेतच करावं लागेल
* वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंतच
* आंदोलकांची संख्या ५,००० पर्यंत मर्यादित
* वाहने फक्त ठराविक मार्गांनीच प्रवेश करतील
* मुख्य नेत्यांसोबत फक्त ५ वाहनेच मैदानात जाण्याची परवानगी
* बाकीची वाहने पोलिसांनी ठरवलेल्या भागात पार्क करावी लागतील
* आंदोलनादरम्यान ध्वनीक्षेपक वापर आणि गोंगाटास बंदी
* अन्न शिजवणे, कचरा टाकणे आणि लहान मुले, गर्भवती स्त्रिया किंवा वृद्धांचा सहभाग नको
* गणेशोत्सवातील वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. यंदाचं आंदोलन गणेशोत्सवाच्या काळात होत असल्याने त्याकडे राज्य सरकार, पोलीस प्रशासन आणि न्यायालय सुद्धा अतिशय सावधगिरीने पाहत आहेत. आता हे आंदोलन काय वळण घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.