मराठा आरक्षणासाठी लाभणार कोल्हापुरातून सांस्कृतिक आवाज — शिवशाहीर दिलीप सावंत यांचा पोवाडा पथकासह सहभाग

कोल्हापूर - मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्र एकवटला आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 28 ऑगस्ट 2025 रोजी आझाद मैदान मुंबई येथे भव्य आंदोलन होणार आहे. या ऐतिहासिक लढ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, कोल्हापूरचे शिवशाहीर दिलीप सावंत यांचं पोवाडा पथक विशेष आकर्षण ठरणार आहे. मुख्य पोवाडाकार शाहीर दिलीप सावंत असून भगवान आबळे, समाधान कांबळे, मारुती रणदीवे, ढोलकी वादक सुरेश काडंगावकर, हार्मोनियम वादक संजय परब असे या पथकातील सहकलाकार आहेत. या मोहिमेला सकल मराठा कोल्हापूरचे वसंतराव मुळीक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. चंद्रकांत पाटील, राहुल इंगवळे, शशिकांत पाटील, रूपेश पाटील, उमेश पोवार, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, सुशील भांदीगरे, हेमंत साळोखे, संजय काका जाधव, अवधूत पाटील, राजू लिंगराज, उत्तम जाधव, अश्विन वागळे, अजय शिंदे, डॉ. संदीप पाटील आणि संजय काटकर या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे पथक मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे.