कोल्हापूर सर्किट बेंचने एमपीएससी प्रशासनाला 'केली' महत्वाची सूचना

कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी स्त्री, पुरुष आणि तृतीय पंथीयांच्यासाठी वेगवेगळे कॉलम आहेत. मात्र तृतीय पंथीय उमेदवारांनी एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरल्यानंतर त्याची नोंद होत नव्हती. त्यामुळे गेली २ वर्षे अनेक तृतीयपंथीय उमेदवारांना या परीक्षेपासून वंचित राहावे लागले होते. या प्रकरणी तृतीय पंथीयांच्या संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरातील सर्किट बेंच येथे एमपीएससी प्रशासनाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. याचिकेवरील सुनावणी दरम्यान आज न्यायालयाने एमपीएससी प्रशासनाला परीक्षा प्रवेश पोर्टलमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना दिल्यात, अशी माहिती तृतीय पंथीय अर्जदार शिवानी गजबर यांनी दिलीय. न्यायालयाच्या या सूचनेमुळे आता तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होणार आहे.