गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजारामपुरीत पोलिसांकडून संचलन...

राजारामपुरी पोलीस रूट मार्च

<p>गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजारामपुरीत पोलिसांकडून संचलन...</p>

कोल्हापूर - गणेश उत्सवाचा सण उद्यापासून सुरू होतोय. कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात गणेशोत्सव मोठ्या ईर्ष्येने आणि उत्साहात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलिसांच्या वतीने गणेश मूर्ती आगमन मिरवणूक मार्गावर संचलन करण्यात आलं. राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ४ पोलीस अधिकारी, २५ अंमलदार, ५६ होमगार्ड, तसंच डायल वन वन टू वाहन, चार्ली पेट्रोलिंग वाहन आणि पोलीस मुख्यालयाकडील आरसीबी स्ट्राइकिंग फोर्स फाईव्ह फायटर यात सहभागी झाले होते. यावेळी दंगल काबू नियंत्रण पथकाची प्रात्यक्षिकं देखील सादर करण्यात आली.