पाचगावात बंदूक दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न...

संशयिताविरोधात गुन्हा दाखल

<p>पाचगावात बंदूक दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न...</p>

कोल्हापूर – काल (सोमवारी) रात्री पाचगाव येथे एका गणेश मंडळाची आगमन मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीच्या दरम्यान गाणी लावण्यावरून वाद झाला आणि यातूनच एका तरुणाने आपल्या चारचाकी वाहनातील बंदूक काढून भर रस्त्यात महिला आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

 या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमात प्रसारित झाल्यानंतर आज दिवसभर सर्वत्र चर्चा सुरू होती. याची दखल घेत करवीर पोलिसांनी गणेशोत्सव मिरवणुकीत बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या संशयीत रणजीत गवळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे.