जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांना निधीची कमतरता भासणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

 

<p>जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांना निधीची कमतरता भासणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार</p>

<p> </p>

कोल्हापूर - जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे आणि मंदिरांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात.  आता जिल्ह्यात सर्किट बेंच देखील स्थापन झालय.  यामुळे  जिल्ह्याची जबाबदारी वाढली असून सर्व कामे  गुणवत्तापूर्ण आणि भविष्यदृष्टी ठेवून करावीत, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कामात वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रसंगी निलंबनाची कारवाई करू , असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे ,वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, राहुल आवाडे आणि शिवाजी पाटील  आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणी दरम्यान कोणत्याही नागरिकाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्यावी असे निर्देश दिले. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या किरणोत्सव प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ देऊ नये. मंदिर परिसर आणि आतील नूतनीकरणाची कामं  करताना नैसर्गिक दगडांचा वापर करावा आणि गुणवत्तापूर्ण कामं  करावीत, अशा सूचना त्यांनी केल्या.