कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार पत्रकार उत्तम पाटील यांना जाहीर 

<p>कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार पत्रकार उत्तम पाटील यांना जाहीर </p>

कोल्हापूर -  हॉकी लीजेंड पद्मभूषण मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार समिती आणि काली रमण फाउंडेशन इंडिया यांच्यावतीने दरवर्षी मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार कोल्हापूरातील एस न्यूज चे पत्रकार उत्तम पाटील यांना जाहीर झाला आहे.
येत्या २९ ऑगस्ट रोजी दसरा चौक येथील शाहू स्मारक भवनमध्ये हा पुरस्कार सोहळा होणार आहे. हॉकी लीजेंड पद्मभूषण मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार समिती आणि काली रमण फाउंडेशन इंडिया यांच्या वतीने अनेक सामाजिक आणि क्रीडा उपक्रम राबवले जातात.  २९ ऑगस्ट या दिवशी  हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा होणार आहे. या दिवशी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या लोकांचा मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार देवून सन्मान केला जातो. हा पुरस्कार जाहीर झाल्यापासून उत्तम पाटील यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.