पुण्यात सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की...

पुणे – पुण्यात जनावरं ताब्यात घ्यायला गेले असताना रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला आहे.
दोन महिन्यांपूर्वी सांगलीच्या शेतकऱ्यांना मारहाण करून त्यांच्या दहा म्हशी जबरदस्तीने पुण्यातील फुरसुंगीच्या गोशाळेत नेऊन ठेवल्याचे सांगितले होते. शेतकऱ्यांनी न्यायालयात जाऊन या म्हशी परत मिळवण्यासाठी आदेश मिळाले होते. तो आदेश घेऊन शेतकरी गोशाळेत म्हशी घेण्यासाठी गेल्यावर म्हशी गोशाळेत नसल्याचे लक्षात आलं. विचारपूस केल्यावर या गोरक्षकांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन म्हशींना चरायला डोंगरावर सोडल्यावर त्या निघून गेल्याचे उत्तरं दिले आहे. यावेळी हा धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे.