मनोज जरांगेंच्या मराठ्यांना विशेष सूचना...
आंदोलन शांततेत करायचं. जाळपोळ, दगडफेक करायची नाही

मुंबई - २७ ऑगस्टपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा बांधवांशी संवाद साधला.
यावेळी जाळपोळ, दगडफेक करायची नाही, शांततेत आंदोलन करण्याच्या सूचना त्यांनी मराठा बांधवांना दिल्या. शांततेत आंदोलन करूच आपण मराठा आरक्षण मिळवायचं असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजून दोन दिवस आहेत त्यांनी आमच्या आरक्षणाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा. या दोन दिवसानंतर आम्ही कोणाचंही ऐकणार नाही, आम्ही गुलाल उधळूनच गावी परतणार आहे. आम्ही कायदा सोडून बोलत नाही, आम्ही हट्टीपणा करत नाही. मुख्यमंत्री आडमुठेपणा करत आहेत. आमच्या आंदोलकांवर लाठीचार केला तर याद राखा, असा दम त्यांनी राज्य सरकारला दिला.