​हुपरी-तळंदगे रोडवर दुचाकी-चारचाकी अपघात; दोन जण गंभीर जखमी

<p>​हुपरी-तळंदगे रोडवर दुचाकी-चारचाकी अपघात; दोन जण गंभीर जखमी</p>

हुपरी : हुपरी-तळंदगे रोडवर चारचाकी आणि दुचाकी यांच्यात रविवारी मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पट्टणकोडोलीचे डॉक्टर जयपाल कांबळे आणि तळंदगेचे इर्षद तब्बलगी यांचा समावेश आहे. अपघातानंतर दोघांनाही तातडीने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अपघात इतका जोरदार होता की दुचाकी सुमारे ५० फूट अंतरावर फरफटत गेली. यामध्ये एकाच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. ही घटना तळंदगे फाटा येथील हॉटेल आरवच्या समोर घडली. अपघातानंतर चारचाकी गाडीतील चालक गाडीतील पिशवी घेऊन फरार झाला.हा चालक हुपरीतील एसआरएम ज्वेलर्सचा व्यापारी असल्याचे समजते. अधिक तपास स्थानिक हुपरी पोलीस करत आहेत.