म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांसाठी सेबीकडून मोठी घोषणा 

<p>म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांसाठी सेबीकडून मोठी घोषणा </p>

मुंबई - म्युच्युअल फंडमध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्या महिलांसाठी सेबी विशेष लाभ देणार आहे. जेणेकरून महिलांचा म्युच्युअल फंडमध्ये सहभाग वाढावा, असा सेबीचा उद्देश आहे.
सेबीचे अध्यक्ष तुहिन कांत पांडे यांनी सांगितले कि,  म्युच्युअल फंडमध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्या महिलांना विशेष प्रोत्साहन लाभ दिला जाऊ शकतो. जोपर्यंत महिलांचा समान सहभाग होत नाही, तोपर्यंत आर्थिक समावेशनाचे काम अपूर्णच राहील. पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्या महिलांना अतिरिक्त प्रोत्साहन दिले जावे, असा प्रस्ताव आम्ही म्युच्युअल फंड वितरकांना देत आहोत. प्रत्येक एसआयपी एका बीजासारखे असून, तेच पुढे जाऊन मोठ्या वृक्षाचे रूप घेऊ शकते, असे त्यांनी सांगितले.