निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईचा अध्यक्ष बदलला...

<p>निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईचा अध्यक्ष बदलला...</p>

मुंबई – आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  भाजपने मुंबईचा अध्यक्ष बदलला आहे. आक्रमक वक्तृत्व असलेले अमित साटम हे नवे अध्यक्ष झाले आहेत. यापूर्वी आशिष शेलार हे मुंबईचे अध्यक्ष होते. त्यात बदल करण्यात आला आहे. नवीन अध्यक्षांची घोषणा मुंबईतील भाजप मुख्यालयात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. 

अमित साटम यांनी गेली अनेक वर्षे मुंबईच्या पश्चिम उपनगरात नगरसेवक आणि आमदार म्हणून काम केले आहे. अमित साटम हे तीनवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांना मुंबईतील नागरी प्रश्नांची चांगली जाण आहे.