कोल्हापुरातील सिध्दार्थनगरमधील जनजीवन पूर्वपदावर...

<p>कोल्हापुरातील सिध्दार्थनगरमधील जनजीवन पूर्वपदावर...</p>

कोल्हापूर - शुक्रवारी रात्री उशिरा कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरातल्या राजेबाग स्वार मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त लावण्यात आलेल्या डिजिटल फलक आणि साऊंड सिस्टिमवरून दोन गटात राडा झाला होता. यावेळी दोन्ही बाजूच्या जमावाने केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले होते तर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक जखमी झाले होते. दरम्यान शनिवारी दुपारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन्ही गटाच्या प्रमुख मंडळींनी एकत्र येत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना समज दिल्यानंतर या वादावर पडदा टाकण्यात आला.

 आज या परिसरात तणावपूर्ण शांतता होती. खबरदारी म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सद्या हळूहळू या ठिकाणचे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. या दंगली प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोनशेहून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांची लवकरच धरपकड करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.