इचलकरंजीत मित्रावर हल्ला करणाऱ्यास पोलिस कोठडी...

इचलकरंजी - शहरातील गणेशनगर परिसरात राहणारा रावजी कोंडीग्रे आणि त्याचा मित्र आप्पा कलढोने हे दोघे एका बारमध्ये बसून मद्यपान करत होते. यावेळी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली. बारच्या बाहेर पडल्यानंतर हा वाद पुन्हा वाढला. यावेळी आप्पा याने कोंडीग्रेवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमी कोंडीग्रेला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले. या हल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी कोंडीग्रेचा मित्र आप्पा कलढोने याला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.