‘माझ्या शरीरात...’ ; आ. गोपीचंद पडळकर यांच्याविषयी बोलताना सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर

सांगली – “माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी गोपीचंद पडळकर यांच्यासोबत राहीन, असे जाहीर वचन रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांनी आ. गोपीचंद पडळकर यांना दिले आहे. यावेळी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. गोपीचंद पडळकर उपस्थित होते.
आम्ही दोघेही आक्रमकपणे भूमिका मांडत राहिलो नाही तर विरोधक आम्हाला नैवेद्यालाही शिल्लक ठेवणार नाहीत. गोपीचंद पडळकर हे वंचितांसाठी प्रस्थापितांच्या विरोधात आक्रमकपणे उभे राहतात. त्यामुळे प्रस्थापित राजकारण्यांचा गोपीचंद पडळकर यांच्यावर राग असल्याचे सदाभाऊ खोत म्हटले आहेत.