‘प्रत्येक प्रवासाला शेवट असतो आणि म्हणूनच मी...’
फलंदाज चेतेश्वर पुजारा याची मोठी घोषणा

मुंबई – “भारतीय संघासाठी खेळणे, जर्सी घालणे, राष्ट्रगीत गाणे आणि देशासाठी मैदानात सर्वोत्तम कामगिरी करणे हा अनुभव शब्दांत व्यक्त करणं अशक्य आहे. मात्र प्रत्येक प्रवासाला शेवट असतो आणि म्हणूनच मी भारतीय क्रिकेटमधील सर्व स्वरूपांमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेत असल्याची” मोठी घोषणा सोशल मिडियावर भारतीय क्रिकेटचा तांत्रिक फलंदाज चेतेश्वर पुजारा याने केली आहे.
पुजाराने आतापर्यंत भारतासाठी तब्बल 103 टेस्ट सामने खेळले आहेत. या काळात त्याने 19 शतकं आणि 35 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याच्या बॅटमधून एकूण 7 हजार 195 धावा आल्या असून सरासरी 43.60 इतकी राहिली. 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करणाऱ्या पुजाराने शेवटचा सामना देखील ऑस्ट्रेलियाविरुद्धच 2023 मध्ये खेळला होता. दीर्घकाळ भारतीय संघाचा विश्वासू व स्थिर फलंदाज म्हणून त्याने आपला ठसा उमटवला आहे.
https://www.instagram.com/p/DNue3PlZm_c/?utm_source=ig_web_button_share_sheet