कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची महत्वाची सूचना

कोल्हापूर - साळोखेनगर उंच टाकी येथील गुरुत्ववाहीनीवर व्हॉल्व बसविण्याचे काम रविवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी सुरू करण्यात येणार आहे. हे काम त्याच दिवशी रात्रीपर्यंत पूर्ण करून नंतरच पाणीपुरवठा सुरू केला जाईल. त्यामुळे संपूर्ण ए आणि बी वॉर्ड परिसरात रविवारच्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आलेआहे.
प्रभावित भाग -- पुईखडी, कलिकते नगर, सुलोचना पार्क, इंगवले कॉलनी, नाना पाटील नगर, आपटे नगर, कणेरकर नगर, सानेगुरुजी वसाहत, राजोपाध्ये नगर, बिडी कॉलनी, हिंदू कॉलनी, म्हाडा कॉलनी, शिवगंगा कॉलनी, वाल्मीकी वसाहत, जिवबा नाना परिसर, बापूरामनगर, साळोखेनगर, राजीव गांधी वसाहत, कात्यायनी कॉम्प्लेक्स, तपोवन, देवकर पाणंद, मोरे माने नगर, संभाजीनगर स्टँड, नाळे कॉलनी, रामानंद नगर, बालाजी पार्क, शाहू कॉलनी, सासणे कॉलनी, रायगड कॉलनी, जरगनगर, सुभाषनगर, शेंडापार्क, आर. के. नगर, भारती विद्यापीठ, गंजीमाळ, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, पोतणीस बोळ, मंगेशकर नगर, बेलबाग, महालक्ष्मीनगर, सरनाईक वसाहत, त्रिकोणे गॅरेज, नेहरूनगर, वाय. पी. पोवार नगर, जवाहर नगर व आजूबाजूचे ग्रामीण भाग.