मराठा महासंघाची सोमवारी कोल्हापुरात बैठक

 

आ. अशोकराव मानेंनी 'त्या' जागेचा अट्टाहास सोडावा : मराठा महासंघ

<p>मराठा महासंघाची सोमवारी कोल्हापुरात बैठक</p>

<p> </p>

कोल्हापूर - कोल्हापूर आणि सातारा ही दोन्ही जिल्हे मराठ्यांच्या राजधानीची ठिकाणं आहेत. दोन्ही जिल्ह्यात ५० टक्कयांहून अधिक मराठा समाज राहतो आहे. मात्र या ठिकाणी मराठा भवन नाही याची उणीव वारंवार मराठा समाजाला भासतेय, ही गरज लक्षात घेऊन मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीने कोल्हापूर शहरातील रिविजनल सर्वे नंबर ६७९ / ३ ही हॉकी स्टेडियम नजीकची सहा एकर जागा मराठा भवन साठी देण्याची मागणी करण्यात आली होती.

 यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसंच राज्याच्या महसूल विभागाकडं गेली १३ वर्षे सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे. सकल मराठा समाजानं याठिकाणी मराठा भवन उभारण्यासाठी देणगी स्वरूपात कोट्यवधी रुपयांचा निधीही गोळा केला आहे. मात्र सत्ताधारी गटाचे आमदार अशोकराव माने यांनी याच जागेची मागणी त्यांच्या महिला औद्योगिक संस्थेसाठी केलीय. त्यानंतर शासनानं ही जागा संबंधित संस्थेला दिल्यानं सकल मराठा समाजात प्रचंड रोष निर्माण झाल्याचं महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितले.  आमदार अशोकराव माने यांना परवडणारा नाही त्यामुळं आमदार माने यांनी या जागेचा अट्टाहास सोडावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात सोमवारी २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवन येथे  सकल मराठा समाजाची व्यापक बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुळीक यांनी दिलीय. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, चंद्रकांत चव्हाण, विजय काकोडकर, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, उदय देसाई, संयोगिता देसाई, अवधूत पाटील मनोज नरके, आर डी पाटील आदी उपस्थित होते.