गार्डन्स क्लब तर्फे ५५ व्या उद्यान स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर - कोल्हापुरात बागकाम आणि पर्यावरण प्रेम वाढवण्याच्या दृष्टीने एक उत्तम उपक्रम म्हणून ओळखली जाणारी गार्डन्स क्लबची वार्षिक उद्यान स्पर्धा जाहीर झालीय. यंदाची ही ५५ वी स्पर्धा दि. ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडणारय.
कोल्हापुरातील गार्डन्स क्लबतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही बागप्रेमींसाठी उद्यान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. स्पर्धेतील प्रत्येक बागेचं परीक्षण शास्त्रोक्त आणि पारदर्शक पद्धतीनं करण्यात येणारय. बागेचा आराखडा, झाडांची विविधता, निगा, स्वच्छता, झाडांची तजेलदार अवस्था, सेंद्रिय खतांचा व औषधांचा वापर या निकषांवर परीक्षण केलं जाईल. परीक्षणासाठी वास्तू रचनाकार, शेतीतज्ज्ञ आणि वनस्पती तज्ज्ञांचा समावेश असलेली स्वतंत्र समिती नियुक्त केली जाते. हे परीक्षण केवळ स्पर्धेसाठी न राहता सहभागी उद्यानप्रेमींना तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठीही उपयुक्त ठरते.
स्पर्धेचे विभाग-
खाजगी बागा – क्षेत्रफळानुसार:
१) मोठे (१०,००० चौरस फूटपेक्षा अधिक)
२) मध्यम (५,००० - १०,००० चौरस फूट)
३) लहान (३,००१ - ५,००० चौरस फूट)
४) मिनी (३,००० चौरस फूटपेक्षा कमी)
टेरेस गार्डन, किचन गार्डन आणि बाल्कनी गार्डन या विशेष स्पर्धाही समाविष्ट.
संस्था व सार्वजनिक बागा:
१) मोठ्या बागा (३ एकरपेक्षा जास्त)
२) मध्यम बागा (२ ते ३ एकर क्षेत्र)
३) लहान बागा (अर्धा ते दोन एकर)
४) मिनी बागा (अर्धा एकरपेक्षा कमी क्षेत्र)
कारखाना विभाग:
१) मोठे (३ एकरपेक्षा अधिक क्षेत्र)
२) मध्यम (२ ते ३ एकर क्षेत्र)
३) लहान (अर्धा ते दोन एकर)
४) मिनी (अर्धा एकरपेक्षा कमी क्षेत्र)
अर्ज व नोंदणी:
स्पर्धेचे फॉर्म्स १५ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत
सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत भरता येतील.
फॉर्म मिळण्याचे ठिकाण: कॅडसन कलर लॅब, जेम स्टोन, एस.टी. स्टँडजवळ, कोल्हापूर
संपर्क: ८८०५९८२८६०
ऑनलाइन फॉर्मसाठी व अधिक माहितीसाठी:
www.gardensclubkolhapur.org