कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ‘इतका’ मिमी पाऊस 

 सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने  पंचगंगेची पाणी पातळी स्थिरावली आहे त्यामुळे पूरबाधितांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 16.5 मिमी पाऊस झाला आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 50.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 
गेल्या 24 तासात हातकणंगले- 8.5 मिमी, शिरोळ -5.1 मिमी, पन्हाळा- 25.8 मिमी, शाहुवाडी- 19.1 मिमी, राधानगरी- 38.8 मिमी, गगनबावडा- 50.8 मिमी, करवीर- 10.1  मिमी, कागल- 10.1 मिमी, गडहिंग्लज- 12.7 मिमी, भुदरगड- 16.7 मिमी, आजरा- 25.9 मिमी, चंदगड- 16.6 मिमी असा एकूण 16.5 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
सध्या राज्यमार्ग 10 बंद झाले आहेत. प्रमुख जिल्हा मार्ग 39 बंद आहे तर इतर जिल्हा मार्ग 14 आणि ग्रामीण मार्ग 30 असे एकूण 44 रस्ते  बंधाऱ्यावर, रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीस बंद आहे. बंद असलेल्या मार्गासाठी पर्यायी मार्गावरुन वाहतूक सुरु आहे.