दिलासा : पंचगंगा नदी ‘इतक्या’ फुटावर...

<p>दिलासा : पंचगंगा नदी ‘इतक्या’ फुटावर...</p>

कोल्हापूर – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु असल्याने नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे लोकांना स्थलांतर व्हावे लागत आहे.  परंतु गेल्या दोन तासांपासून नदीची पाणी पातळी स्थिर राहिल्याने लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळी ११ वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी  राजाराम बंधाऱ्याजवळ ४२ फुट ११ इंच होती.