वडणगे फाटा वाहतुकीसाठी बंद...

कोल्हापूर – धरण क्षेत्रात सुरु असेलल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या वाढलेल्या पातळीमुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यानुसार पोलीस प्रशासनाकडून वडणगे फाटयावरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली आहे.
राधानगरी धरणाचा स्वयंचलित 6 आणि 7 व्या दरवाज्यातून 2 हजार 856 क्युसेक व BOT पॉवर हाऊस मधून 1500 क्युसेक असा एकूण 4 हजार 356 क्युसेक इतका विसर्ग नदी पात्रात सुरु आहे