राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर...

मुंबई – राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रतिक्षा सर्वांना लागली असताना पुण्याच्या राज्य सहकारी आयुक्तांनी सहकारी संस्थांची निवडणूक ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.
राज्यातील अनेक जिल्हयांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे सहकारी निवडणूक आयुक्तांनी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.