मोबाईल कंपन्यांचा ग्राहकांना दे धक्का... 

 

जिओ पाठोपाठ एअरटेलने सर्वात स्वस्त प्लॅन केला बंद

<p>मोबाईल कंपन्यांचा ग्राहकांना दे धक्का... </p>

<p> </p>

मुंबई -  काही दिवसांपूर्वी जिओने २४९ रूपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन बंद केला. त्याऐवजी जिओच्या ग्राहकांना २९९ रूपयांचा प्लॅन घ्यावा लागला आता जिओ पाठोपाठ एअरटेलने सुध्दा २४९ रूपयांचा प्लॅन बंद केला आहे. या प्लॅन मध्ये ग्राहकांना २४ दिवसांची व्हॅलिडीटी, दररोज एक जीबी डाटा, अनलिमिटेड कॉलिंग, आणि १०० एसएमएस दिले जात होते. हा प्लॅन ग्राहकांमध्ये सर्वात लोकप्रिय होता मात्र हा प्लॅन बंद केल्याने ग्राहकांना २९९ रूपयांचा प्लॅन घ्यावा लागणार आहे. या प्लॅनमध्ये २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. मात्र पूर्वीच्या तुलनेत हा पन्नास रूपयांनी महाग झाला आहे. दोन्ही कंपन्यांनी स्वस्त प्लॅन बंद केल्यामुळे ग्राहकांना आता महागड्या प्लॅन्सचा पर्याय निवडावा लागणार आहे. आता केवळ व्होडाफोन आयडिया या एकमेव कंपनीचा २४९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन सुरू आहे.

 

#jio #airtel