गोकाक धबधब्याचं रौद्र रूप...

<p>गोकाक धबधब्याचं रौद्र रूप...</p>

बेलगाम – गेल्या चार – पाच दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील नद्या, धरणे ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे अनेक धबधबेही प्रवाहित झाले आहेत. धबधब्यासाठी प्रसिद्ध असणारा कर्नाटकातील गोकाक धबधबाही ओसंडून वाहू लागला आहे.

संततधार पावसामुळे गोकाक धबधब्याचे रौद्र रूप पहायला मिळत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.