श्रीक्षेत्र नृसिंहवाडी मंदिर दर्शनासाठी बंद...

<p>श्रीक्षेत्र नृसिंहवाडी मंदिर दर्शनासाठी बंद...</p>

कोल्हापूर – जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. या वाढलेल्या पाणी पातळीमुळे नदी किनारी असणाऱ्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी मंदिरात पाणी शिरले आहे. त्यामुळे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
कुरुंदवाड - शिरढोणला जोडणाऱ्या पंचगंगा नदीच्या पुलावरही  पुराचे पाणी आले आहे. तसेच अनेक वाहतुकीचे मार्गही बंद करण्यात आले आहेत.