दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला...

नवी दिल्ली – दिल्ली कॅम्प ऑफिसमध्ये आज सकाळी जनसुनावणी घेत असताना दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
त्या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, हल्ल्याचे कारण अद्याप कळालेलं नाही. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.