वेदगंगा नदीला पूर... 'या' मार्गावरील वाहतूक बंद

<p>वेदगंगा नदीला पूर... 'या' मार्गावरील वाहतूक बंद</p>

कोल्हापूर - गेल्या दोन - तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे वेदगंगा नदीला पुर आला आहे. पुराचे पाणी मुरगुड-निढोरी मार्गावर आल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वेदगंगा नदीवरील वाघापूर, कुरणी आणि सुरपली इथले बंधारे पाण्याखाली गेल्याने या बंधाऱ्यावरील वाहतूक बंद आहे.  बानगे पूल परिसरातही पाणी आल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे हमीदवाडा-बस्तवडे-केनवडे मार्गावर पाणी आले आहे. मुरगुड-वाघापूर रस्ता बंद झाला असून, कापशी-मुरगुड मार्गावरीलही वाहतूक विस्कळीत झाली होती.